एक पणती माझ्या स्वराज्याची
एक पणती माझ्या राजमाता जिजाउंची
एक पणती माझ्या धनी शिवरायांची
एक पणती माझ्या सर्जा शंभू रायाची
एक पणती ह्या मातीसाठी रक्त सांडलेल्या मावळ्याची
एक पणती अभेद्य बुलंद आमच्या गडकोटांची
एक पणती माझं स्वराज्य रक्षिलेल्या त्या प्रत्येक चिर्याची
एक पणती माझ्या राजा पुढं झुकलेल्या त्या सागरी लाटांची
एक पणती बाजीची, तानाची, जीवाची
एक पणती थोर भाग्यवंत त्या काशीद शिवाची
एक पणती त्या अफाट बेलाग सह्याद्रीची
एक पणती उरी दाटलेल्या अभिमानाची
एक पणती प्रेम वात्सल्य मायेची
एक पणती अभिमान, शौर्य, राष्ट्रप्रेमाची
एक पणती माझ्या स्वराज्याच्या थाटाची
एक पणती राजं तव चरणी माझ्या गडवाटची ! ! !
जय शिवराय ! !
जय महाराष्ट्र ! !

Leave a Comment